इंडस्ट्री 4.0
तुम्ही तयार आहात का ?
आमची आजी जात्यावर दळण दळायची तिथपासून ते आम्ही आज आमच्या मोबाइल वरून भाकरीचे पीठ (आजच्या काळात "आटा" ) ऑनलाइन घरपोच मागवतो ह्या एका मोठ्या बदलाचे आपण साक्षी आहोत. आपल्या स्वयंपाक घरातील फ्रिज , मिक्सर आणि ओव्हन एकमेकांशी बोलतील आणि घरातील फ्रिज इंटरनेट सोबत जोडला गेला असल्यामुळे फ्रिज मधील ठेवलेली भाजी संपली तर फ्रिज स्वतः ऑनलाइन ऑर्डर करेल व भाजी घरपोच मिळेल असे जर कोणी सांगत असेल तर. जरा विचित्र वाटले तरी आपण अशा प्रकारच्या जगाकडे वाटचाल करत आहोत हे तर नक्की आहे आणि मग यालाच क्रांती म्हणायचे का? माणसाने जसजशी प्रगती कडे वाटचाल सुरु ठेवली तसतशी जगात क्रांती होत गेली असे म्हणावे लागेल .
इंडस्ट्री 1.0 - साधारणतः अठराशे च्या दशकात औद्योगिक क्रांतीला इंग्लंड मध्ये सुरुवात झाली . क्रांती म्हणजे ज्या वस्तू लोक घरामध्ये साधी हत्यारे वापरून बनवत असत त्याच वस्तू आता फॅक्टरी मध्ये तयार होऊ लागल्या. याचे मुख्य कारण माणसाची गरज वाढू लागली होती. त्याला सर्व लगेच आणि कमी वेळेत हवे होते .अशाच प्रकारे अठराशे च्या दशकात औद्योगिक क्रांती १. ला सुरुवात झाली . त्यावेळेस माणसाने वाफ व पाणी यांच्या शक्तीचा वापर करून बरेच बदल औद्योगिक क्षेत्रात घडवून आणले. त्यापैकी काही शोध म्हणजे वाफेचे इंजीन , फ्लयिंग शटल, कॉटन गिन आणि सिमेंट. ह्याच काळात वस्त्रोद्योगामध्ये क्रांतिकारी बदल घडून आले.
इंडस्ट्री 2.0 -एकोणिसाव्या व विसाव्या शतकामध्ये विजेचा वापर सर्व फॅक्टरी मध्ये वाढला. ह्या मशीन ने माणसांचे काम कमी केले व उत्पादन क्षमता देखील वाढीस लागली . ह्याच काळात असेम्ब्ली लाइन मुळे मोठ्या प्रमाणावर निर्मिती (mass production ) करण्याचे तंत्र माणसाने अवगत केले . त्यामुळे वस्तू मोठ्या प्रमाणात व कमी वेळेत तयार होऊ लागलया.
इंडस्ट्री 3.0 -साधारणतः १९७० ते २००० च्या काळात ज्या मशीन फक्त विजेवर चालत होत्या त्या मशीन ला इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व संगणक (कॉम्प्युटर ) जोडून मशीनची उत्पादकता व क्षमता वाढविण्यात आली. सर्व जग हे ऑटोमेशन म्हणजे स्वयंचलित मशीन कडे म्हणजेच माणसाचा कमीत कमी हस्तक्षेप असलेया प्रकाराकडे जाऊ लागले.
इंडस्ट्री 4.0 - मागील दशकाच्या मध्यापासून इंडस्ट्री 4.0 ला सुरुवात झाली. यामध्ये सर्व मशीन ह्या इंटरनेट सोबत जोडल्या गेल्या व जग अगदी आपल्या बोटांवर आले. उदाहरण घ्यायचे झाले तर २००६ पूर्वी अँड्रॉइड , उबर , 4G किंडल आणि व्हाट्सअप असे काहीही नव्हते परंतु ह्या सर्व गोष्टी आल्यापासून जग फार जवळ आले आणि माणसे जोडली गेली. म्हणूनच जो टेलेफोन सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यास ७५ वर्षे लागली, फेसबुक सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यास ४ वर्षे तर इंस्टाग्राम साठी २ वर्षे लागली. परंतु पोकेमेन व पब जी सारखे गेम करोडो लोकांपर्यंत अगदी २० ते २५ दिवसात पोहोचले.
हे सर्व बदल इंडस्ट्री मध्ये होत असताना त्याचा जागतिक स्तरावर परिणाम होणारच. जागतिक स्तरावर काय परिणाम होतील याचा अंदाज बांधणे आपल्याला कठीण जाईल परंतु समाजात काय बदल होऊ शकतो त्या श्यक्यतांचा विचार करणे व बदलत्या काळासाठी तयार होणे हि आपली विद्यार्थी म्हणून जबाबदारी आहे. पूर्वी एखादी कंपनी लोकांना वस्तू तयार करून विकायची अथवा एखादी सेवा पुरवायची ज्यागोगे त्यांना पैसे मिळायचा. आता इंडस्ट्री 4.0 मध्ये लोक चक्क प्लॅटफॉर्म विकतात. म्हणजेच आपल्याला व विक्रेत्याला एकाच प्लॅटफॉर्म वर आणून दोघांचा व्यवहार घडवून आणतात. जसे कि उबर,ओला,आणि स्वीगी हे फक्त प्लॅटफॉर्म तयार करून विकतात ज्यायोगे आपण विक्रेत्यांशी जोडले जातो.
इंडस्ट्री 4.0 मध्ये मशीन हे कॉम्पुटर आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे यांचा वापर करून इंटरनेट सोबत अशा पद्धतीने जोडले गेले आहे कि ते स्वयंचलित (automated ) होईल मग मशीन स्वतः निर्णय घेऊ शकेल. जर मशीन स्वतः निर्णय घेत असेल असेल तर माणसाने बनविलेले मशीन माणसापेक्षा श्रेष्ठ होत आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे. माणूस आणि मशीन यांच्या मधील फरकाची रेषा पुसून जाईल. मानवानंतर डॉल्फिन श्रेष्ठ आहे असे बोलण्याऐवजी मशीन नंतर माणूस हा एकमेव बुद्धिमान प्राणी आहे असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते काय ? सध्या माणसाच्या शारीरिक ,मानसिक ,भावनिक या सर्व गोष्टींशी मशीनने ताळमेळ साधला आहे. माणूस मशीन कडून शिकतो कि मशीन माणसाकडून शिकते हेच कळेनासे झालेय. कारण आपण जेव्हा गुगल मधे माहिती सर्च करतो तेव्हा आपल्याला वाटते कि मी मशीन कडून माहिती घेतली पण प्रत्यक्षात गुगल ने सुद्धा तुमच्याकडून माहिती घेतली म्हणजे तुम्ही काय काय सर्च करतात त्यावरून तुमची माहिती गोळा करून तुम्हाला काय विकायचे अथवा दाखवायचे हे मशीन ठरवते. म्हणजेच मशीन सुद्धा तुमच्याकडून शिकते व त्यानुसार तुम्हाला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करते. मग जर मशीन माणसापेक्षा हुशार झाले झाले तर माणूस मशीन चालवितो कि मशीन माणूस चालवते ? हा प्रश पडू शकतो. मशीन जर माणसाचे नियंत्रण करत असेल तर माणूस मशीन चा गुलाम होईल का ? मग त्याचे स्वातंत्र्य ? असे अनेक पैलू इंडस्ट्री 4.0 मध्ये विचार करण्यास भाग पडतात.
इंडस्ट्री 4.0 होणारे फायदे
१. प्रगतशीलते कडून प्रगत देश म्हणून भारताची ओळख होईल.
२. जे तंत्रज्ञान इतर प्रगत देशात आहे ते सर्व भारतात उपलब्ध होईल.
३ सरकार व जनता यांच्यामध्ये जवळीक निर्माण होईल व सरकारला जनतेसाठी विविध योजना राबविणे सोयीस्कर होईल.
४. कृषी उद्योगामध्ये मोठा बदल घडू शकतो. उत्पादन क्षमता व उत्पादन गुणवत्ता वाढणार असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.
५. वैद्यकीय क्षेत्रात मोठा क्रांतिकारी बदल घडून येणार असल्याचे तज्ज्ञ म्हणतात ज्यायोगे रोगांचे निदान करणे व उपचार करणे सोपे होणार आहे.
६. शैक्षणिक क्षेत्रात टच अँड लर्न हि संकल्पना उदयास येईल.
यासारखे अजून खूप फायदे इंडस्ट्री 4.0 ने संपूर्ण देशाला होणार आहे.
इंडस्ट्री 4.0 होणारे तोटे
१. भारत हा जगातला सहावा सर्वात मोठा उत्पादन करणारा तसेच खूप जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. इंडस्ट्री 4.0 मुळे सर्व कामे स्वयंचलित झाल्यामुळे प्रचंड नोकर्या धोक्यात आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतात ६९ टक्के नोकऱ्या कायमच्या जातील अशी श्यक्यता आहे.
२. पारंपरिक जे व्यवसाय भारतात होते ते सॉफ्टवेअर चा वापर वाढल्यामुळे बंद पडले अथवा बंद पडतील.

३. ज्या गोष्टी वारंवार कराव्या लागतात त्या सर्व स्वयंचलित केल्या जातील व तिथले रोजगार पूर्णपणे कमी होतील.
४. ज्या कामात कौशल्य असण्याची गरज नाही ती कामे कमी होतील व श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अजून गरीब होईल अशी श्यक्यता काही तज्ञ करतात.
५. काही विचारवंतांच्या मते भारतात स्वर्ग होईल तर काही विचारवंत देशाला खूप समस्यांचा सामना करावा लागेल असे मत व्यक्त करतात.
पुढे काय होईल हे आपण आताच सांगू शकत नाही मात्र काळाची पावले ओळखून स्वतःमध्ये काय बदल करायचा याचा विचार आपण नक्की करू शकतो. यासाठी तज्ञ विचारवंत, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती व सरकार यांनी एकत्र येऊन सर्वांच्या फायद्याचा विचार करावा असे वाटते.
Some Quotes on Industry 4.0
We do not want to just define issues; we want to help to create solutions.
-Klaus Schwab (Author of The fourth Industrial Revolution )
In the new world it is not big fish eats the small, its the fast fish which eats the slow fish.

माहिती संकलन व शब्दांकन
श्री. सुरज पांगारकर
#This article is written for diploma engineering students to aware them about industrial revolution 4.0

☺️👌👍
ReplyDeleteNice and analytical
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteSir notes kuthe aahet
ReplyDelete